घरगुती गॅसच्या दरात ११.४२ रुपयाने वाढ

नवी दिल्ली: गॅस सिलेंडर वितरकांच कमिशन वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाने घरगुती गॅसच्या दरात ११.४२ रुपयाने वाढ झाली आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने ह्यासंबंधीचे आदेश दिले आहेत. यानुसार एलपीजी डीलर्सचे कमिशन आता २५.८३ रुपयाने वाढवून ३७.२५ रुपये प्रती सिलेंडर करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनुसार एलपीजी डीलर्सच्या कमिशनमध्ये वाढ केल्याने याचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे. ह्याबरोबरच एलपीजी सिलेंडरच बाजार मूल्यसुद्धा महागणार आहे.

हा निर्णय सरकारच्या सबसिडीयुक्त सिलेंडरच्या एका वर्षात ६ एवढी मर्यादा घोषित केल्यानंतरच्या आठवड्याभरातच आला आहे.

पेट्रोल आणि डीझेलचे दर ही वाढू शकतात. कारण पेट्रोलियम मंत्रालयाने डीलर्सचे कमिशन वाढवण्याच्या विचारात आहे. पेट्रोलवर २३ पैसे आणि डीझेलच कमिशन १० पैसे प्रती लिटर वाढवण्याची शक्यता आहे.

मात्र डीलर्स कमिशनमध्ये अजून जास्त वाढ करून हवी आहे. डीलर्सना पेट्रोलवर ६७ पैसे तर डिझेलवर ४२ पैसे प्रती लिटर कमिशन वाढवण्याची मागणी केली आहे.

पेट्रोल-डीझेल डीलर्सनुसार, वीज, पाणी, पेट्रोल आणि डीझेल भावात वेळोवेळी बदल झाल्याने त्यांच्या गुंतवणुकीत वाढ झाली आहे.

online marathi news

online marathi news
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s