सैफिनाच लग्न मुंबईत

हो.. सैफिनाच लग्न होणार आहे मुंबईत आणि तेही रजिस्टर पद्धतीने.. सैफिनाच लग्न १७ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे, ही कन्फर्म बातमी खुद्द वधूचे वडील रणधीर कपूर यांनी दिली. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं.

आधी अशी चर्चा होती कि, सैफिनाच लग्न पतौडीच्या महालात होणार. पण या सगळ्या चर्चा फोल ठरवत रणधीर यांनी सांगितलं की, ” १७ ऑक्टोबरला सैफिनाचा ना हिंदू ना मुस्लीम तर रजिस्टर पद्धतीने होणार आहे. रजिस्ट्रार घरी येऊन रजिस्टर पद्धतीने लग्न लावलं जाईल. ह्या लग्नाला अगदी जवळची आणि घरातल्याच लोकांची उपस्थिती असेल. आणि लग्नानंतर असणारा वलीमा म्हणजेच रिसेप्शन दिल्लीत आहे. ज्याची संपूर्ण तयारी शर्मिला टागोर यांनी केली आहे. या रिसेप्शनला बॉलीवूडमधील सेलिब्रिटीज, राजकीय क्षेत्रातील आणि पतौडी कुटुंबातील पाहुणे येणार आहेत.”

सूत्रानुसार, सप्टेंबर महिन्यातच सैफिनाने बांद्रा कोर्टात विवाहाची नोंदणी केली होती. तेव्हापासूनच हे लग्न नक्की थाटामाटात होणार कि रजिस्टर याबाबत चर्चांना उधाण आलं होत.

करीना धर्म बदलणार कि नाही? याबाबतही बरीच चर्चा होती, यावर रणधीर म्हणाले कि. ‘लग्न रजिस्टर पद्धतीने होणार असल्याने धर्म बदलण्याचा प्रश्नच येत नाही.’

तसंच करीना लग्नानंतरही बॉलीवूडमध्ये काम सुरूच ठेवणार असल्याच त्यांनी सांगितलं. करीनाच्या सासूबाई शर्मिला टागोर यांनाही लग्नानंतरच बॉलीवूड यश मिळालं होत. माधुरी दीक्षित, करिष्मानेही लग्नानंतर बॉलीवूडमध्ये यश मिळवलय. त्यामुळे करीनाही काम करेल अस त्यांनी सांगितलं.

मग फायनली सैफिनाच लग्न मुंबईत होणार असं आत्तातरी म्हणायला हरकत नाही.

online marathi news

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s