सचिन तेंडुलकर होणार `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया`चा सदस्य

नवी दिल्ली: क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडुलकरच्या नावावर अजून एक विक्रम जोडला जाणार आहे.

भारत दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान जूलिया गिलार्ड यांनी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट खेळामधील योगदानासाठी ‘ऑडर ऑफ ऑस्ट्रेलिया’ च्या सदस्यत्वाने सम्मानित करण्याची घोषणा केली.

ऑस्ट्रेलियाचे कॅबिनेट मंत्री सायमन क्रीन लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सचिन तेंडुलकरला ‘एएम’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या विशेष सम्मानाने त्याला सन्मानित करतील.

पत्रकारांशी बोलताना गिलार्ड म्हणाल्या की,” मला आनंद आहे की, तेंडुलकरला ‘ऑडर ऑफ ऑस्ट्रेलिया’ च्या सद्स्यतेने सन्मानित केल जाणार आहे. हा खूपच विशेष सन्मान आहे. हा सन्मान क्वचितच ऑस्ट्रेलिया बाहेरच्या नागरिकांना देण्यात येतो. परदेशातील मैदानांवर दुसऱ्या क्रिकेटपटूंना नेहमी आपल्या खेळाने अचंबित करणारा खेळ सचिन खेळतो. या महान फलंदाजासाठी हा एक विशेष सन्मान आहे.”

दक्षिण आफ्रिकेत चॅम्पियन्स लीग टी-२० मध्ये खेळत असलेला तेंडुलकर, हा सन्मान मिळवणारा दुसरा भारतीय आहे. ह्याआधी पूर्व अॅटर्नी जनरल सोली सोराबजी ह्यांना सन्मानाने सन्मानित करण्यात आल होत.

सोराबजी यांना २००६ मध्ये ‘ऑस्ट्रेलिया-भारत द्विपक्षीय कायदे संबंधांसाठी’ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा मानद सदस्य बनवण्यात आलं होत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक लगावणारा सचिन एकमेव फलंदाज आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आतापर्यंत १९० टेस्ट मॅचेसमध्ये १५,५३३ धावा केल्या आहेत. ह्याशिवाय तेंडुलकरच्या नावावर ४६३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये १८,४२६ धावांचा विक्रम आहे.

Online News Website

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s