नागरिकांचा ऑटो-टॅक्सी बॉयकॉट डे

मुंबई: सध्या सर्व मोबाईल आणि सोशल नेटवर्किंग साइटसवर मेसेज फिरतोय तो ऑटो-टॅक्सी बॉयकॉट डे. हो… ऑक्टोबर ३१ ला ऑटो-टॅक्सी बॉयकॉट डे करायचा निर्धार काही मुंबईकरांनी मिळून केला आहे. त्यातील अनेक जणांनी या दिवशी रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास न करता चालत किंवा बसने जाण्याचा ठरवलं आहे.

मुंबई ग्राहक पंचायतने ही या नो ऑटो-टॅक्सी डेला समर्थन दिलं आहे. अनेक समाजसेवी संस्थांनी मिळून हा नो ऑटो-टॅक्सी डे यशस्वी करायचं ठरवलं आहे. यासाठी नागरिकांना ही आवाहन करण्यात येत आहे. विविध ठिकाणी पोस्टर्स आणि पत्रक देखील वाटण्यात येत आहे. तसचं बेस्टला ही त्यादिवशी ज्यादा बसेस सोडण्याची विनंती करणार पत्र पाठवण्यात आलं आहे.

ऑटो-टॅक्सीच्या भरमसाठ भाडेवाढी विरोधात हे पाऊल उचलण्यात येणार आहे. मुंबई ग्राहक पंचायतीला या अन्यायकारक भाडेवाढी आणि ऑटो-टॅक्सी चालकाविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. पंचायतीने नागरिकांना यासंबंधीच्या तक्रारी mgpanchayat@yahoo.com या इमेलवर पाठवण्याच आवाहन केलं आहे. ह्या तक्रारी मुंबई हायकोर्टापर्यंत पोचवण्यात येतील.

मुंबई ग्राहक पंचायतीने याबाबत जनहित याचिका ही दाखल केली आहे. ज्याची पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबरला आहे. तसंच याबाबत राज्यातर्फे प्रतिज्ञापत्रसुद्धा दाखल करण्यात येईल. मागच्या सुनावणीत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला ऑटो-टॅक्सी भाडेवाढीबाबत फटकारलं होत. तसंच’ह्या भाडेवाढीबाबत पुन्हा एकदा विचार करण्यात यावा असे आदेश ही न्यायालयाने दिले होते. आणि ऑटो-टॅक्सी चालकांना दरपत्रक ठळकपणे दिसतील अश्याप्रकारे लावण्यास सांगितले होते.

आता या ‘नो ऑटो-टॅक्सी डे’ ला नागरिकांचा किती प्रतिसाद मिळतो ते.

Online marathi news channel

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s