सेट टॉप बॉक्सला शिवसेनेचा विरोध

मुंबई: मुंबईत केबल टी.व्ही ऐवजी १ नोव्हेंबरपूर्वी सेट टॉप बॉक्स लावणे बंधनकारक असल्याच्या नियमाला विरोध करण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’तून सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. तसेच या नियमामुळे सामन्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.

सेट टॉप बॉक्स बसविण्यासाठी ग्राहकांना ३१ ऑक्टोबरची डेडलाइन देण्यात आली आहे. डेडलाइन नंतर सेट टॉप बॉक्स न बसविणाऱ्यांच्या टीव्हीवर चॅनेल दिसणार नाहीत.

“सर्वसामान्यांसाठी सध्या टीव्ही हेच एकमेव मनोरंजनाचे माध्यम असून त्याद्वारे ते ताणतणाव विसरण्याचा प्रयत्न करतात आणि क्षणभर विरंगुळा अनुभवतात, मात्र काँग्रेसने मनोरंजनाचे हे माध्यमही बंद करायचे ठरवले आहे”, असा आरोप शिवसेनाकार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सेट टॉप बॉक्स केवळ ३० ते ३५ टक्के घरांमध्ये बसविण्यात आले असल्याने बॉक्स बसविण्याची मुदत वाढवून द्यावी. ग्राहकांनी या धोरणाला विरोध केल्यास शिवसेना त्यांच्या पाठिशी उभी राहील असेही त्यांनी सांगितले.

Shiv Sena opposes Set top box policy

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s