सेलिब्रेटींची दिवाळी

अनुष्का शर्मा –

ही दिवाळी माझ्यासाठी  खूपच स्पेशल आहे. दिवगंत यश चोप्रांचा ‘जब तक है जान’ दिवाळीत १३ नोव्हेंबरला रिलीज होतोय. मी,शाहरुख खान आणि कतरिना कैफच्या यात प्रमुख भूमिका आहेत.दिवाळीत भरपूर फटाके उडवून झाले की घरी येऊन आईच्या हातच्या पदार्थांवर ताव मारायचा हा आमचा लहानपणी दिवाळीत ठरलेला कार्यक्रम. दिवाळी हा असा सण आहे ज्यामुळे आपल्याला भरपूर एनर्जी मिळते.

दीपिका पदुकोण –

दिवाळी मला माझ्या कुटुंबासोबत साजरी करायला खूप आवडते. दिवाळीत मी माझे सर्व काम बाजूला ठेवते. आमच्या घरी लक्ष्मी पूजन केले जाते. आईच्या हातच्या मिठाईचा आस्वाद घेतला जातो. त्यानंतर आम्ही सुट्टीसाठी एखाद्या पर्यटनस्थळी जातो.

गोविंदा –

मी कुटुंबाबरोबरच दिवाळी साजरी करतो. दिवाळीत आमचे शेड्युल  ठरलेले असते प्रथम लक्ष्मी पूजन नंतर संपूर्ण कुटुंबासोबत पत्त्यांची मैफिल जमवणे. आणि हो माझी पत्नी सुनीताला आवर्जून गोल्ड नेकलेसचा  सेट मी भेट देतो.

सोनाक्षी सिन्हा –

दिवाळी या सणाला सर्व एकत्र येतात.मजा-मस्ती करत कुटुंबासोबत हा सण आनंदात साजरा करतात.या दिवाळीत माझी फिल्म सन ऑफ सरदार रिलीज होतोय त्यामुळे ही दिवाळी माझ्यासाठी खास आहे.

मी लहानपणी खूप फटाके उडवायची.पण आता फक्त फुलबाजी लावून दिवाळीचे स्वागत करते. फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करता येऊ शकते . फटाके पर्यावरणासाठी घातक  आहेत.

अर्जुन कपूर –

मी कामातून लहानसा ब्रेक घेऊन दिवाळी कुटुंबासोबत आणि फ्रेंड्सबरोबर साजरी करणार आहे. मला फटाके उडवायला आवडतात परंतु पर्यावरण  राखण्यासाठी फक्त पणत्या लावून दिवाळी साजरी करतो.

Celebrity News

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s