शिवाजी पार्कातील चौथरा हटवण्यासाठी महापालिकेची शिवसेनेला नोटीस

मुंबई :‘शिवाजी पार्कची जागा रिकामी करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू’, अशा प्रकारची नोटीस मुंबई महापालिकेने शिवसेनेला बजावली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कार केलेल्या जागी शिवसेनकडून चौथरा बांधण्यात आला आहे हा चौथरा त्याठिकाणी कायम रहावा अशी शिवसेनेची इच्छा आहे.

मुंबई महापालिकेने खासदार संजय राऊत आणि महापौर सुनील प्रभू यांना नोटीस बजावून शिवाजी पार्कवरील जागी बांधण्यात आलेला चौथरा ताबडतोब हटवण्याचा आदेश दिला आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवाजी पार्कची जागा शिवसेनेला एका दिवसासाठी देण्यात आली होती. मात्र ही जागा शिवसैनिकांसाठी पवित्र स्थान असून शिवतीर्थावर बाळासाहेबांचे स्मारक व्हावे यासाठी शिवसेनेने आग्रही भूमिका घेतली होती. परंतु काही कालावधीनंतर सेनेने नरमाईची भूमिका घेत अन्य ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा शोधत असल्याचे सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. या सर्व अनुयायांची व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात येते. त्यामुळे ही गर्दी लक्षात घेता बाळासाहेबांचा चौथरा हलवण्यासाठी पालिकेने  प्रयत्न सुरू केले  आहेत.

Shaivaji_PArk_jai_maharashtra

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s