शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची २४ तास गस्त

मुंबई: महापालिकेने स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्क मैदानावर बांधण्यात आलेला चौथरा हटवण्यासाठी शिवसेनेला नोटीस दिली. या नोटीसला विरोध करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्कवर हजर झाले असून बाळासाहेबांच्या चौथऱ्याला शिवसैनिक खडा पहारा देत आहेत.

दररोज जवळपास ५०० शिवसैनिक बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कातील चौथऱ्याचे संरक्षण करत आहेत. सुमारे आठ ते दहा तासांच्या शिफ्टमध्ये शिवसैनिक पहारा देत आहेत. मुंबई-ठाणे शहरातून हजारो शिवसैनिकांनी शिवाजी पार्ककडे आपला मोर्चा वळवला आहे. बाळासाहेबांवर जिथे अंत्यसंस्कार झाले तो चौथरा हटवला जाऊ नये, म्हणून चौथऱ्याभोवती शिवसैनिक दाटीनं उभे राहिले आहेत. सध्या ठाण्यातील शिवसैनिक बाळासाहेबांच्या चौथऱ्याचे संरक्षण करत आहेत. शिवाजी पार्कवर शिवसैनिकांकडून २४ तास गस्त घातली जात आहे.

शनिवारी रात्री दक्षिण मुंबईतील शिवसैनिक बाळासाहेबांच्या चौथऱ्यासाठी पहारा देत होते. विभागप्रमुख भाऊ कोरगावकर आणि पांडुरंग सकपाळ यांनीही शिवाजी पार्कमध्ये आपली हजेरी लावली होती. तर रविवारी सकाळी शहापूर येथून २००० शिवसैनिक रात्रभर पहारा देणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या ड्युटीवरून सोडण्यासाठी आले. शहापूरच्या शिवसैनिकांनी सकाळी ९ ते रात्री ९ असा पहारा दिला तेव्हा भांडूप,विक्रोळी आणि घाटकोपर येथील शिवसैनिक त्यांना ड्युटीवरून सोडण्यासाठी तेथे दाखल झाले. अशाप्रकारे शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या चौथऱ्याची डोळ्यात तेल घालून निगराणी करत आहेत.

या शिवसैनिकांना त्यांच्या या चौथऱ्याला पहारा देण्याविषयी विचारले असता, “आम्हाला शिवाजी पार्कमध्ये गस्त घालण्यासाठी येताना बरोबर स्वतःचे जेवण आणि पाणी आणणे आवश्यक असते. तसेच जोपर्यंत आमची शिफ्ट संपत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडू शकत नाही,”असे घाटकोपर येथील शिवसैनिकाने सांगितले.

दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी यासंदर्भात संपर्क केला तेव्हा राऊत म्हणाले,”परंतु चौथऱ्याची जागा शिवसैनिकांसाठी श्रध्देचे स्थान आहे,शिवसेनेकडून शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या चौथऱ्याला पहारा देण्याविषयी कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. शिवसेनाप्रमुखांवरील प्रेम आणि त्यांच्यावरील निष्ठेपायी शिवसैनिक मोठ्या संख्येने बाळासाहेबांच्या चौथऱ्याला पहारा देत आहेत.”

Jai Maharashtra

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s