ऊ ला ला गर्लची मेहंदी आणि संगीत

कांजीवरम साडी, हातावरची मेहंदी, बंगाली स्टाइल फुलांचे दागिने आणि चेहऱ्यावर खळाळत हास्य.

विद्या बालनच्या खार येथील घरी बुधवारी पार पडलं मेहंदी फंक्शन. हे मेहंदी फंक्शनसुद्धा मंगळवारी पार पडलेल्या प्री वेडिंग बॅश कम संगीत सेरेमनीसारखंच प्रायव्हेट होत.

ज्याला विद्याचे कुटुंब आणि बॉलीवूडमधील आमंत्रितांमध्ये  केवळ रेखाचा समावेश होता. रेखा आणि विद्याचं खूप चांगल बॉन्डींग आहे. रेखा अवतरली गॉर्जियस ग्रीन सारीत.

तर विद्याने नेसली होती फेव्हरेट डिझायनर सब्यसाचीने डीझाइन केलेली कांजीवरम साडी. ही मेहंदी सेरेमनी प्रायव्हेट असली तरी विद्याने बाहेर येऊन मीडियाला फोटो काढण्याची संधी दिली. आणि ती आपल्या चाहत्यांना म्हणाली, “मेहंदी रचने दिजीए फिर देखिये.”

विद्या आणि सिद्धार्थ आधीपासूनच त्यांच्या अफेयर आणि विवाहाबाबत मौन बाळगून होते. पण मंगळवारी झालेल्या प्री वेडिंग बॅश कम संगीत सेरेमनीत या दोघांनी पहिल्यांदा मीडियासमोर एकत्र पोज दिली. संगीत सेरेमनीला ही विद्याने इंडियन लाल, ऑरेंज, मरून, आणि ब्राऊन अशा शेडस असलेली साउथ सिल्क नेसली होती. आणि त्याला मॅचिंग गोल्ड ज्वेलरी. तर सिद्धार्थने घातला होता क्रीम कलरचा गोल्डन थ्रेड वर्कवाला चुडीदार-कुर्ता.

१४ डिसेंबरला विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. हे लग्न पंजाबी आणि साउथ इंडियन पद्धतीने होणार आहे. विद्या ही तामिळ आहे तर तिचा होणारा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर हा पंजाबी. हा विवाह चेंबूरमधील छेडानगर परिसरातील श्री सुब्रमण्यम समाज मंदिरात होणार आहे.

विद्या आणि सिद्धार्थ यांचं २०१० पासून अफेअर सुरु आहे, पण या दोघांनीही कधीच ही गोष्ट मीडियासमोर कबूल केली नाही.

latest bollywood celebrity news

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s