टोल नाक्याच्या बनावट पासची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई: टोल नाका  व पे आणि पार्कच्या  बनावट पासची  विक्री करणाऱ्या  टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात टुरीस्ट गाडीच्या वाहनचालकांना हे पास विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून २७.८३ लाखांचे बनावट पास पोलिसांनी जप्त केले आहेत.

अटक करण्यात आलेला आरोपी जगदंबाप्रसाद मिश्रा (४०) हा कंत्राटदार पे आणि पार्किंगचा व्यवहार पहायचा आणि बनावट पासची विक्री करायचा तर आरोपी सोमनाथ माझी (२६) हा या  बनावट पासची छपाई करायचा,अशी माहिती गुन्हे शाखेचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी दिली आहे. या दोघा आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे रॉय यांनी सांगितले.

वांद्रे वरळी सी लिंकचे बनावट पास कुल्याब्यातील ताज हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत अशी टीप पोलिसांना मिळाली. ही टीप मिळाल्यावर टुरीस्ट गाडीचा वाहनचालक असल्याचे सांगून पोलीस हा पास विकत घ्यायला गेले. त्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला. मिश्रा मागील दीड वर्षांपासून माझीकडून हे बनावट पास तयार करून घ्यायचा असे पोलीस तपासात उघड झाले आहे. मूळ पास आणि बनावट पास यांच्यातील फरक ओळखणे फारच कठीण असल्याने आरोपी हे पास टुरीस्ट गाड्यांच्या वाहनचालकांना अर्ध्या किंमतीत विकत होते .

या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Marathi News

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s