बॉलीवूडमध्ये ही सुरु आहे ख्रिसमसची धूम. एकीकडे पतौडीच्या बेगम करीनासाठी हा ख्रिसमस आहे ‘स्पेशल’ तर परफेक्शनिस्ट आमिर खान थायलंडमध्ये ख्रिसमस साजरा करणार आहे.
करीनासाठी ह्या वर्षीचा ख्रिसमस खास आहे कारण आता बेबो झाली आहे बेगम. ख्रिसमस सेलिब्रेशननंतर सैफिना फायनली जाणार आहेत त्यांच्या लाँग अवेटेड हनिमूनला स्वित्झर्लंडच्या हसीन वाद्यांमध्ये.
करीना वर्षभर कितीही बिझी असली तरी ती ख्रिसमस कधीच मिस करत नाही. करीनाची आई बबिता ही ख्रिश्चन धर्म मानते. त्यामुळे लहानपणापासूनच करीना ही ख्रिसमस विशेष आवडीने साजरा करते.
latest bollywood celebrity news
Advertisements