दिल्ली बलात्कार प्रकरण: शिवसेना – मनसे आमने – सामने

मुंबई: शिवसेनेचे उध्दव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांच्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. ‘त्या’ बलात्कार प्रकरणातील आरोपी बिहारी असल्याचा आरोप मनसेचे राज ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे नव्या वादंगाला तोंड फुटलेले असतानाच शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’ या दैनिकाने त्या वादात उडी घेतली आहे.

दैनिक सामनाच्या संपादकीयमध्ये राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका करण्यात आली आहे. संपादकीयमध्ये राज ठाकरेंचा उल्लेख नसला तरी रोख त्यांच्या वक्तव्याकडेच असल्याचे सहजच लक्षात येते.

सामनाचे संपादकीय  – बलात्कारानंतरचा बलात्कार !

“बलात्कारी व अतिरेक्यांना जात, धर्म, प्रांत नसतो व असे लोक बाईची जात-प्रांत पाहून बलात्कार वगैरे करीत नाहीत. जसे ‘दलित महिलांवर बलात्कार’ किंवा ‘अमुकतमुक जातीच्या महिलेची विवस्त्र धिंड’काढल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. खरे म्हणजे अशी जातीची लेबलं अशा गुन्ह्यांना आणि गुन्हेगारांना तुम्ही का चिकटवता? हे नराधम महिलांची जात पाहून बलात्कार करीत नाहीत. हा त्यांच्या मनातील राक्षस असतो. सध्या दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे जे कवित्व देशात सुरू आहे त्यावरून असेच म्हणावेसे वाटते. दिल्लीतील ती दुर्दैवी, पीडित तरुणी तडफडून मेली असली तरी अनेकांचे फडफडणे सुरूच आहे.”

Online Marathi News Portal

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s