बेगम हॅज चेंजड्

कोणीतरी म्हटलंय की, ‘ प्रेम एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकत’ ह्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कारण एकेकाळी पूर्ण व्हेजिटेरीयन झालेली करीना आता पतौडी खानदानाची बेगम झाल्यावर फिशेटेरीयन झाली आहे.
एकेकाळी शाहीद कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालेली करीना त्याच्या प्रेमापोटी शाकाहारी होण्याच्या निर्णयामुळे तिचे बाबा रणधीर कपूर आणि सर्व कपूर कुटुंबालाच धक्का बसला होता. कारण करीना तंदुरी चिकन एवढ आवडायचं की, ती तंदुरी चिकनच्या नावाने शपथ घ्यायची.

पण आता बेबोची झाली आहे बेगम करीना. आणि हो… संपूर्ण शाकाहार घेणारी करीना आता चक्क चक्क मासे खाऊ लागली आहे. करीनाच्या या फिशेटेरीयन होण्याचा धक्कादायक खुलासा खुद्द तिच्या सासूबाई शर्मिला टागोर यांनी नुकत्याच एका टेलिव्हिजन इंटरव्हयूत केला.

जेव्हा बेगमच्या सासूबाई शर्मिला यांना बेबोच्या जेवणाच्या सवयीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांची सून बेबो शाकाहारी असल्याने तिच्यासाठी काय खास बनवायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर असायचा.

कारण शर्मिला ह्या स्वतः बंगाली आहेत आणि त्यात पतौडी खानदानाची सून झाल्यावर मांसाहार तर अनवधानाने आलाच. त्यामुळे त्यांना शाकाहारी डिशेश फारश्या येत नव्हत्या. पण आता म्हणे करीना फिशेटेरीयन झाल्याने करीनाच्या सासूबाई तिच्यासाठी खास बंगाली स्टाइलची फिश करी करतात.

खरंच प्रेम एखाद्याला आपल्या रंगात अगदी रंगून टाकत. मग धर्म काय? देश काय? लोक आपलं आधीच सगळ आयुष्यही विसरून जातात, मग बेगम करीना तर फक्त व्हेजीटेरीयनची फिशेटेरीयन झाली आहे.

कही ये सब नवाब का कमाल तो नही.

Marathi News

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s