प्रेम करूया खुल्लम खुल्ला

Latest News in Mumbai

वी आर जस्ट फ्रेंड्स… आमच्यात असं काहीच नाही. मिडिया काहीही छापत असते. असं म्हणणारे बॉलीवूडचे लव्हबर्डस काही दिवसांपासून मात्र अगदी खुल्लमखुल्ला फिरताना दिसत आहेत. हे लव्हबर्डस आहेत रणबीर कपूर-कतरिना कैफ आणि शाहरुख खान-प्रियांका चोप्रा.

काही वर्षापासून रॉकस्टार रणबीर आणि कॅटचा ऑन-ऑफ रोमान्स सुरु आहे. आणि प्रत्येक वेळी एकत्र दिसल्यावर त्यांनी आपल्यात रिलेशन नाही, असंच म्हंटल आहे. पण मागच्या काही आठवड्यांपासून हे कपल एकमेकांच्या कंपनीत चांगलाच रमलेल आहे.

ह्या लव्हबर्डसची भेट झाली ‘अजब प्रेम गजब कहानी’च्या शूटिंगदरम्यान. (जेव्हा नुकताच रणबीर आणि दीपिकाचा ब्रेकऑफ झाला होता), त्यावेळी हे लव्हबर्डस अगदी रात्रीबेरात्री एकमेकांच्या घरून निघताना मिडीयाने रंगेहाथ पकडलं पण नेहमीप्रमाणे वी आर जस्ट फ्रेंड्स असंच त्यांनी म्हंटल. पण आता मात्र हे दोघ खुल्लम खुल्ला फिरत आहेत.
रणबीर आणि कॅटचा खुल्लमखुल्ला फिरण्याचा सिलसिला सुरु झाला न्यू इयर सेलिब्रेशनच्या काही दिवसाआधी. चर्चा होती की, हे लव्हबर्डस एकत्र न्यू इयर सेलिब्रेट करणार आहेत. आणि अगदी तसंच झालं. हातात हात घालून हे लव्हबर्डस एलएच्या गल्ल्यांमध्ये फिरत होते. एवढंच नाहीतर मॅनहॅटनमध्ये त्यांनी स्टीव्हन स्पीलबर्गचा ‘लिंकन’ हा ऑस्कर नॉमिनी पिक्चरसुद्धा एकत्र पाहिला. ‘अंजनाअंजानी’ या चित्रपटाच्या वेळेला प्रियांका आणि रणबीरच्या हुकअप्सच्या बातम्या असल्या तरी खरंतर रणबीर आणि कॅटने तेव्हा एकत्र न्यू इयर सेलिब्रेट केलं होत.

हे झालं न्यू इयरचं. पण न्यू इयरला जणू या कपलने नवीन रिजोल्युशनचं केल्याप्रमाणे नंतर ही ते एकत्र दिसले आणि तेही बी-टाऊनमध्ये. एका अवोर्ड फंक्शनसाठी कतरिनाचं अगदी अपरात्री पाहते ३ वाजता ते सकाळी ८ पर्यंतच शूट होत, मग काय रणबीरसुद्धा तिला कंपनी देण्यासाठी तिथे पोचला. बरोबर आहे ना आता असं रात्री अपरात्री शूट असल्यावर काळजी वाटण साहजिक आहे ना.

आता रणबीर इतकी काळजी घेतो म्हंटल्यावर कॅट तरी कशी मागे राहिलं. आपल्या भावी सासूबाई नीतू कपूर एका अवोर्ड फंक्शनमध्ये परफॉर्म करणार म्हणून कॅट लगेच त्यांच्या मदतीला गेली. आणि तिचं हे काइंड जेस्चर सगळ्यांनीच नोटीस केलं.

त्यानंतर ह्या जोडीला अगदी टिपिकल कपलप्रमाणे २० जानेवारीला एका थिएटरमधून बाहेर पडताना बघण्यात आलं. बाहेर पडताना आरकेचं जॅकेट कॅटने घातलं होत एवढंच नाही तर त्याची कॅपसुद्धा घातली होती.

अब बारी है दुसरे सो कॉल्ड कपल किंग खान आणि पिग्गी चॉप्सची. ह्या दोघांच्या जवळीकीमुळे काय काय नाही झालं… दोन घनिष्ठ मित्र शाहरुख आणि अर्जुनमध्ये फूट पडली. गौरीने शाहरुखला प्रतिबंध घातले. पण तरीही प्यार कभी रोके रूकता नही.

काही दिवसांच्या सीझ फायरनंतर पुन्हा हे कपल एकत्र दिसू लागलं आहे. या कपलाला चांगलाच फायदा मिळाला आहे तो बी-टाऊनच्या अवोर्ड सीझनचा. आधी हे दोघ दिसले रॉनी स्क्रूवालाने नवंविवाहित जोडप विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूरसाठी थ्रो केलेल्या रिसेप्शनला. पण तेव्हा गौरीसुद्धा एसआरकेबरोबर होती.

नंतर त्याच्या पुढच्या दिवशी मुकेश अंबानीच्या पार्टीला ही पीसी शाहरुखला भेटण्यासाठी बराच वेळ थांबली. जेव्हा शाहरुख हळूच गार्डन एरियात गेला तेव्हा पीसी लगेच आज्ञाधारकपणे त्याच्या पाठी गेली. सूत्रानुसार, तेव्हा किंग खानने पिग्गी चॉप्सला ‘मला ‘टच’ किंवा ‘फॉलो’ करू नकोस’ असं सांगितलं.

हे तर काहीच नाही खरी मजा घडली ती एका प्रतिष्ठित अवोर्ड फंक्शनदरम्यान जेव्हा एसआरके आणि पीसीने एकत्र स्कीट परफॉर्म केलं तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. आणि तो ‘किस’चा किस्सा घडला. एसआरकेने पीसी सर्वांसमोर गालावर कीस केलं. आणि हा परफॉर्मन्स झाल्या झाल्या लगेच पीसी शाहरुखच्या व्हॅनिटी व्हॅनकडे जाताना दिसली.

२० जानेवारीला एका मासिकाच्या अवोर्ड गालामध्ये पिग्गी चॉप्स किंग खानची बहिण लालाच्या बाजूला बसलेली दिसली. आणि गालानंतर एसआरके आणि पीसी पुन्हा एकत्र दिसले.

पण पीसी आणि किंग खानच्या या वागण्यामुळे बी-टाऊनमध्ये काहीस नाराजीच वातावरण आहे. काहींच्या मते पीसी आणि किंग अवोर्ड फंक्शनमधला तो ‘किस’ स्क्रिप्टमध्ये चेंज करून टाळू शकत होते. अशा पब्लीकली वागण्याने ते जास्तीत  जास्त प्रॉब्लेम्सना आमंत्रण देत आहेत.

काहीही असो ह्यावर एकचं म्हणावस वाटत की खुल्लमखुल्ला प्यार कर रहे ये दो बॉली कपल्स इस मिडीया से भी नही डर रहे है ये कपल्स.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s