हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी दोघांना एनआयए कोठडी

नवी दिल्ली: दिल्लीतील न्यायालयाने हैद्राबाद दुहेरी बॉंम्बस्फोटप्रकरणी चौकशीसाठी इंडियन मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना चार दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आली आहे. दिलसुखनगरमध्ये २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या दुहेरी बॉंम्बस्फोटाने संपूर्ण हैद्राबाद शहर हादरून गेले. या बॉम्बस्फोटात १६ लोक ठार तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

सय्यद मकबूल आणि इम्रान खान या दोन दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आले आहे. या दोघांना कोठडी देण्याची मागणी करण्यासाठी एनआयएने अर्ज केला होता. न्यायाधीश आय.एस मेहता यांनी त्यांची मागणी मान्य करत त्यांना एनआयए कोठडीत पाठवण्याची परवानगी दिली.

सूत्रांनुसार, याप्रकरणी आणखी एक संशयित ओबेद-उर-रहमानला अटक करण्यात आली असून त्याच्याबरोबर या दोघांची एनआयए चौकशी करणार आहे.

Online Marathi News

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s