Marathi News Portal

शताब्दी रुगणालय समस्यांच्या विळख्यात

मुंबई: रुग्णांना उत्तम दर्जाच्या सेवा सुविधा देण्यासाठी मुंबई महानगर पालिका प्रशासन दरवर्षी मनपा रुग्णालयांवर करोडो रुपये खर्च करते. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रत्यक्षात कोणत्याही सुविधा रुग्णांपर्यंत पोहचत नाहीत. गोवंडीतील शताब्दी रुगणालयातही असाच काहीसा प्रकार दिसून येतो. या रुग्णालयाला अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत असून त्यांच्या आरोग्याबाबतही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे आता रुग्णालयाच उपचाराची गरज असल्याची प्रतिक्रिया येथील रुग्णांकडून देण्यात येत आहे.

गोवंडी येथे हे महानगरपालिकेचे शताब्दी रुगणालय आहे. चेंबूर, मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी अशा विविध ठिकाणांहून अनेक रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येतात. परंतु या रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करण्यासाठी कोणीच नाही. सुरक्षारक्षक नसल्यामुळं कोणीही या रुग्णालयात येऊ-जाऊ शकते. इथला नेत्र विभागही बंद असल्याने अनेकांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतोय. एवढेच नाही तर गरोदर स्त्रीयांना इथं साधी बसण्याचीही चांगली अशी सोय नाही. एका बाकड्यावर केवळ चार महिला बसू शकतील एवढीच काय ती त्यांच्यासाठी असलेली जागा. त्यामुळं इतर महिलांना तर सरळ तासन तास उभे राहवे लागते. ह्या सर्व गैरसोयींची कल्पना महानगरपालिकेलाही आहे.

महानगरपालिकेचे एम. वार्ड समितिचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी स्वतः या सर्व गोष्टी मान्य केल्या असून आम्ही या रुग्णालयाला समस्यांतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत; परंतु आमच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

काही वर्षांपूर्वी या शताब्दी रुग्णालयाचे ‘मदन मोहन मालवीय’ असे नामकरण करण्यात आले आले आहे. परंतु या थोर नेत्याचे नाव दिलेले हे रुग्णालय त्यांच्या उंचीपर्यंत पोहचणेतर सोडाच अर्ध्यापर्यंत ही हे पोहचले नाही. हे रुग्णालय सायन-पनवेल या महामार्गावर असल्यामुळे महामार्गावर एखादी दुर्घटना घडली तर अपघातग्रस्तांना उपचारासाठी याच रुग्णालयात आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालयात पाठवले जाते.

मनसेच्या मोर्च्यासाठी कडक बंदोबस्त

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी गिरगाव ते आझाद मैदान या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. आझाद मैदान येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यभरातून मनसेचे नेते आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मोर्च्यासाठी १५००० पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. तसेच तीन अतिरिक्त पोलीस आयुक्त तसेच सहा पोलीस उपायुक्तसुद्धा उपस्थित असणार आहेत. यावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

आसामच्या दंगलींमुळे सध्या देशात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना या मोर्च्यामुळे मुंबईतील कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून पोलिसांकडून मनसेच्या दक्षिण मुंबईतील पदाधिकार्यांना मुंबई पोलीस कायदा कलम १४९ अंतर्गत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

मंगळवारी होणाऱ्या मोर्च्याला फक्त आझाद मैदानातच परवानगी देण्यात आली आहे. लाँग मार्च ला परवानगी देण्यात आलेली नाही आहे. लाँग मार्चला परवानगी देण्यात आली नाही या संदर्भात मनसे आमदार बाळा नांदगावकर यांना विचारले असता, परवानगी दिली नसली तरी कोणत्याही परिस्थितीत आम्ही मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s