सासूबाईंच्या पावलावर पाऊल !

तुम्ही हा फोटो पाहताय तो आहे सैफिनाच्या लग्नाचा एक्सक्ल्यूसिव फोटो. रजिस्टर मॅरेज पार पडल्यानंतर ताज पॅलेस हॉटेल कोलाबा येथे सैफ आणि करीनाने एकमेकांना वरमाला घातल्या.

या लग्न सोहळ्यात करीनाने आपल्या सासूबाईंचा घरारा परिधान केला आहे. करीनाच्या सासूबाईं शर्मिला टागोर यांनीही त्यांच्या लग्नात त्यांच्या सासूबाईंकडून मिळालेला हा घरारा घातला होता.

शाही घराण्याची बेगम झाल्यावर मिडीयाला जेव्हा बेगम करिना आणि नवाब सैफचं दर्शन झालं. पण यावेळी सैफ आपल्या नवाबी अंदाजात तर बेगम करीना मात्र बेगम लूकच्या आसपास ही नव्हती.

लग्न झाल्यानंतर ही पतौडी खानदानाची बेगम करीना न वाटता ती बेबोच्याच अवतारात होती..तेही चक्क वेस्टर्न आउटफिट्समध्ये. ना हातात बांगड्या, ना सिंदूर, ना सलवार कमीज. अगदी नॉर्मल बेबो अवतारात.

करीना बेगम आपल्या सासूबाई शर्मिला टागोर यांना तर फॉलो करत नाही ना…..कारण शर्मिलासुद्धा बंगाली असल्या तरी मन्सूर अली खान यांच्याशी विवाह करताना त्यांनी इस्लाम स्वीकारला. आणि परंपरेप्रमाणे ना त्यांनी कधी सिंदूर लावलं ना गळ्यात मंगळसूत्र घातलं. बेबो ही सासूबाईंच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचं चित्र दिसत आहे.

Saifeena Weeding

Saifeena Weeding